अहमदपूर रोटरी तर्फे डॉक्टर्स डे व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

अहमदपूर रोटरी तर्फे डॉक्टर्स डे व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

अहमदपूर ( गोविंद काळे ) रोटरी क्लब अहमदपूरच्या वतीने आज दिनांक एक जुलै 2023 रोजी डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टर्स सन्मान चामले डोळ्याचा दवाखाना येथे करण्यात आला. यावेळेस शहरातील सन्माननीय तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते.
डॉक्टर्स डे चे निमित्त नेत्र तपासणी शिबिर रोटरी क्लब अहमदपूर व चामले नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्ररोग तज्ञ डॉ. रामेश्वर चामले यांच्या सहकार्याने संपूर्ण झाले.
यावेळी जवळपास 92 रुग्णांची निशुल्क तपासणी व औषध उपचार करण्यात आले.
डॉक्टर्स डे निमित्त शहरातील हृदयरोग तज्ञ डॉ. पी एस कदम, डॉ चंद्रकांत उगिले, डॉ विष्णू पदातूरे, डॉ मधुसूदन चेरेकर, डॉ वैभव रेड्डी, डॉ अतुल खडके, डॉ सतीश पेड, डॉ पलमटे, डॉ निलेश मजगे, डॉ जवणे, डॉ पाटील, डॉ. गुणाले, डॉ निजवंते, डॉ राजेश्वर स्वामी, डॉ हेंगणे, डॉ.रामेश्वर चामले. आदी सह शहरातील सन्माननीय डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री शरद जोशी यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन चांमले नेत्र रुग्णालय अहमदपूर येथे करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब अहमदपूरचे अध्यक्ष प्रा शिवशंकर पाटील, सचिव श्रीराम कलमे, प्रा अनिल चवळे, माजी सचिव कपिल बिरादार, गंगाधर याचवाड. नरसिंग चिलकावार, संतोष मद्दैवाड, प्रा द मा माने, प्रा शिवाजी पाटील, राहुल घाटोळ यांच्यासह रोटरीच्या सर्व सदस्य व चांमले हॉस्पिटलचा सर्व स्टाफ यांनी प्रयत्न केले.

About The Author