महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे नऊ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण
उदगीर (प्रतिनिधी) : विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यातर्फे दि.26 मार्च 2023 घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे नऊ विद्यार्थी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यात हिन्दी विषयात मासुंदार इन्सार बंदगीसाब, इंग्रजी विषयात घुगे कोमल मारोती व कदम संगीता सोपानराव, भूगोल विषयात रंगवाळ प्रियंका सुग्रीव, इतिहास विषयात बलशेटवार शिवशंकर ज्ञानोबा, फिजिकल सायन्स विषयात मुंढे मंगेश तानाजी व नगरगोजे नयन संदिपान, गणित विषयात केंद्रे सूर्यकांत अशोक आणि अर्थशास्त्र विषयात हाशमि खालिदास गलेबालि हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी आणि अॅड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.