स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली.

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु – शिष्याची एक मोठी परंपरा आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन करुन आपल्या जीवनातील अडथळे दूर करणारा व्यक्ती म्हणजे आपला गुरु होय. हाच संदेश घेऊन स्वामी विवेकानंद कॅम्पस मधील सर्व शिक्षक, प्राध्यापक यांना पुष्पगुच्छ देऊन गुरुपोर्णिमा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांना कॅम्पस मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य संजय हट्टे, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, जय हिंद पब्लिक स्कूलच्या मॅनेजर ज्योती स्वामी, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ पवार,परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, प्रा. आकाश कांबळे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा.संजीवनी भालेराव,अमोल भाटकुळे, प्रा.ऋतुजा दिग्रसकर, प्रा.राखी शिंदे, अमोल मसुरे,यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author