ना.संजयभाऊ बनसोडे यांचा वाढदिवस गुरधाळ परिसरात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा
उदगीर(एल.पी.उगीले) : उदगीर-जळकोट विधानसभा मतदार संघाचे ना. संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरधाळचे उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे यांनी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे , उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, मंडळ अधिकारी गणेश हिवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार चवळे, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे, युवा उद्योजक आकाश मंठाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरधाळचे सरपंच वैजनाथ झुंकुलवाड हे होते.सर्वप्रथम संयोजकच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक प्रा.नंदकुमार पटणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर सुशांत शिंदे ,रामेश्वर गोरे व प्रा.सिद्धेश्वर पटणे यांची यथोचित भाषणे झाली.
त्यानंतर गुरधाळ, कुमदाळ, मल्लापूर, जाणापूर सह विविध शाळेमधील विद्यार्थ्यांना 5000 वाह्यांचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. गुरधाळ गावातील 10 गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या व्यक्तींच्या लेकरांना प्रा.नंदकुमार पटणे यांनी बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी दत्तक घेतले.
गुरधाळ येथील 51 गरीब कुंटूबातील व्यक्तींना अन्नधान्यच्या किटसाठी मान्यवरांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.याशिवाय ना. संजयभाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुरधाळ येथे वृक्षारोपण कार्यक्रम, मोफत नेत्रतपासणी शिबीर, विविध विकास कामांचे उदघाट्न करण्यात येणार असल्याचे उपसरपंच प्रा.नंदकुमार पटणे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. शिंदे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजक प्रा.नंदकुमार पटणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास गुरधाळ गावातील शालेय समितीचे अध्यक्ष सदानंद बिरादार, तिरुपती भाऊ तरटे , माजी उपसरपंच अनिल महाराज तरटे, सागर तरटे, अजय पाटील,रातिकांत पाटील ,खुशलराव पाटील , विश्वनाथ स्वामी, पांडुरंग पाटील, वैजनाथ अप्पा नागठाणे ,कल्याणीआप्पा नागठाणे ,महावीर नागठाणे, मच्छिंद्र कारांमुंगे, सखाराम पाटील, दीपक पाटील, गणेश मोरतले, दीपक शिंदे ,सूर्यकांत नागठाणे, बाबुराव रेड्डी ,बाबुराव कारामुंगे, सोपान कारामुंगे, किशोर कारामुंगे,राजेंद्र मामा शिंदे, प्रदीप गायकवाड ,दशरथ गायकवाड ,दलित कांबळे, अमोल गायकवाड, बालाजी कांबळे, बाबुराव नागठाणे, बापूराव पटणे, राजकुमार पाटील ,रामेश्वर तोगरगे, माधव शिंदे, यादव शिंदे, तातेराव गायकवाड ,सत्यवान कांबळे, बाळू कारांमुंगे कमल कांबळे,गंगाधर कांबळे, विजयकुमार शिंदे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.