गुरु शिवाय जीवन अंधकारमय – बी.बी नागरवाड

गुरु शिवाय जीवन अंधकारमय - बी.बी नागरवाड

उदगीर (प्रतिनिधी) : गुरु हा दोन अक्षरी शब्द असला तरी जीवनात योग्य वाट दाखवणारा व्यक्ती गुरु होय. गुरुविना जीवन अंधकारमय होते, अज्ञानाकडून ज्ञानाकडे – अंधाराकडून प्रकाशकडे नेणारा गुरु हा दीपस्तंभा सारखा कार्य करतो, म्हणून गुरुचे महत्व व स्थान फार मोठे आहे. गुरु शिवाय जीवन अंधकारमय होते, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी विद्यालयातील शिक्षक बी.बी नागरवाड यांनी आपल्या मनोगतुन व्यक्त केले. ते गुरुपौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासंगी बोलत होते.व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम बांगे, बी.बी नागरवाड, ज्येष्ठ शिक्षिका व्ही.एस गोसावी, के.एम राजुरकर, कलाशिक्षक एन.आर जवळे, आर. एन पाटील,सरिता द्वासे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी, पालक यांची यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचवी वर्गातील विद्यार्थी मंथन बिरादार, बालाजी बिरादार ,आराध्या जाधव ,ईश्वरी जाधव,आर्या बिरादार, साक्षी बिरादार यांनी पुढाकार घेतला.

About The Author