शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्राची विद्यार्थिनी सेट परीक्षेत उत्तीर्ण
उदगीर (प्रतिनिधी) : किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाची विद्यार्थीनी उस्ताद सय्यदा सालेहा सय्यद फैयाजोद्दीन ही प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. अतिशय काठीण्य पातळीवर असलेल्या या परीक्षेत तिने हे यश मिळविलेले आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील,सचिव ज्ञानदेव झोडगे, प्र. प्राचार्य डॉ.अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे,उपप्राचार्य डॉ एस व्ही जगताप यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. उस्ताद सय्यदा सालेहा या विद्यार्थिनीला रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ एच आर तिरपुडे ,डॉ डी बी मुळे, डॉ ए एस टेकाळे, डॉ एस एस पावडे, प्रा.ए टी नरहरे, प्रा जी जी देशपांडे, प्रा पी एस रेड्डी, प्रा दीपमाला बोरोळकर, प्रा. स्नेहा सूर्यवंशी, डॉ एस एस पाटील यांनी मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनीने हे यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे महाविद्यालयाकडून व परिसरातील सर्वांकडून कौतुक केले जात आहे.