पतंजली योग समितीत गुरु पौणिमा उत्साहात साजरा

पतंजली योग समितीत गुरु पौणिमा उत्साहात साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : पतंजली योग समिती उदगीर व राम मंदिर महिला योग साधक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरू पौर्णिमा निमित्ताने राम मंदिर येथे गुरूंना वंदन करून गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरुवातीला राम मंदिरामध्ये रीतसर यज्ञ करण्यात आला.

यामध्ये प्रा.गारठे ,मीनाक्षीताई सुमनताई, ह. भ. प. उद्धव महाराज, प्रा.श्रीराम चामले, सुरेंद्र अकनगिरे, शिवकुमार शिरगिरे, मठपती शिवलिंग, सुहास केंद्रे, नारायणराव पाटील, साईनाथ चिमेगावे,अड.ज्ञानोबा बेदाडे व समितीचे सर्वच पदाधिकाऱ्यानी यात भाग घेतला, अनेक योग साधक महिला या प्रसंगी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा नरेंद्र शिंदे यांनी केले.

प्रमुख व्याख्याते उद्धव महाराज यांनी गुरुचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. त्याचबरोबर भारतीय संस्कृती, योग संस्कृती व हिंदू धर्माबद्दलची माहिती आपल्या व्याख्यानातून उपस्थित साधकांना करून दिली. आपणाला भेटलेला प्रत्येक व्यक्ती हा गुरुच असतो, फक्त त्या व्यक्तीतील गुरूपण शोधता यायला पाहिजे. आणि हेच खूप गरजेचे आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीराम चामले यांनी केले तर आभार अड.ज्ञानोबा बेदाडे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!