सम्राट मित्रमंडळाच्या वतीने डाॅक्टर बांधवांचा सत्कार
मानवी समाजाच्या सशक्तीकरणासाठी डाॅक्टरांची सेवावृत्ती अश्वासक..!
-माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे प्रतिपादन
अहमदपूर ( गोविंद काळे )
मानवी समाजाच्या सशक्तीकरणासाठी काम करणारा डाॅक्टर हा वर्ग सातत्याने सर्वोतपरी कार्य करत असून डाॅक्टरांची ही सेवावृत्ती अश्वासक अशा स्वरूपाची असून समाजमानावर दूरगामी परिणाम करणारी असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले.
सम्राट मित्रमंडळ -लातूर-अहमदपूर च्या वतीने डाॅक्टर दिनाच्या निमित्ताने शहरातील डाॅक्टर बांधवांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय पोलीस अधीकारी मनिष कल्याणकर,मनोहर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तर सत्कारमूर्ती म्हणून डाॅ.अशोक सांगवीकर, डाॅ.ओ.एल.किनगांवकर,डाॅ.पांडूरंग कदम, डाॅ.चंद्रकांत उगीले, डाॅ.मधुसूदन चेरेकर,डाॅ अतूल खडके, डाॅ.राजूरकर,डाॅ.सतिश पेड,डाॅ.बालाजी भोसले, डाॅ.जवने,डाॅ.ऋषिकेश पाटील, डाॅ.प्रविण भोसले, डाॅ.जयप्रकाश केंद्रे, डाॅ.चलवदे,डाॅ.होळकर,डाॅ.सूहास जोशी,डाॅ.कराड,डाॅ. सय्यद मूस्तफा, डाॅ.अखिल शेख, डाॅ.मूंडे,डाॅ.संतोष देवकत्ते,डाॅ.नरहरी सूरनर, डाॅ.पांडुरंग टोंपे आदींसह शहरातील साठ डाॅक्टर बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी सर्व डाॅक्टर्स मंडळींचा शाल पुष्पगूच्छ देवून सम्राट मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावे॓ळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संयोजक,युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,जनतेची थेट सेवा करता येणारे क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे पाहीले जाते.आज खूप मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग होत असून यातून मानवी जीवन सुखी,संरक्षीत करण्याचा प्रयत्न होत आहे.करोना सारख्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स मंडळींनी करोडो लोकांचे जीव वाचविले आहेत.त्यामूळे संबंध मानव जातीवर डाॅक्टर्स मंडळींचे उपकार आहेत असं म्हटलं तर ते धाडसाचं ठरणार नाही.या सेवेबद्दल मानवी समाज कृतज्ञ आहे असे प्रतिपादन केले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार बब्रुवान खंदाडे आपल्या भाषनात म्हणाले की,डाॅक्टरांनी रूग्नांच्या सेवेत सातत्याने समर्पित भावनेने काम केले असून डाॅक्टरांच्या या सेवावृत्तीची समाजाने जाणीव ठेवने गरजेचे आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर म्हणाले की, डाॅक्टरांच्या मूळे समाजजीवन सूखी असून ते देवदूत म्हणून कार्यकरीत आहेत डाॅक्टरांच्या पाठीमागे पोलीस विभाग खंबीर पणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन केले.
या वेळी डाॅ.अशोक सांगवीकर,डाॅ. मधुसूदन चेरेकर यांची समायोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रशांत जाभाडे यांनी केले तर आभार तबरेज सय्यद यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश सांगवीकर,पत्रकार अजय भालेराव, गणेशराव मूंडे, मूकूंद वाघमारे, विलास चापोलीकर,भैय्या क्षिरसागर,बाळू जंगले, सचिन बानाटे आदींनी पुढाकार घेतला.