महात्मा फुले महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार संपन्न
अहमदपूर, ( गोविंद काळे )
येथील महात्मा फुले महाविद्यालयात व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन्मान करून सत्कार केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा गुरु पौर्णिमेनिमित्त यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरु शिष्याच्या नात्याबद्दल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गुरूला फार महत्त्व आहे ; या भूतलावर एकही असा सजीव गुरुविना नाही. आपल्याला पाठ्यपुस्तकाचे ज्ञान देणारा, अक्षर ज्ञान देणाराच गुरु नसतो तर ; लहान थोरांकडून जे काही आपण शिकतो, जे ज्ञान प्राप्त करतो ते पण आपले गुरुच असतात. माता पिता हे आपले प्रथम गुरू आहेत , असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी ह . भ. प. प्रो. डॉ.अनिल मुंढे महाराज,डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. डी.एन. माने, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. संतोष पाटील, प्रा. प्रकाश गायकवाड, प्रा.डॉ. सीमा मोरे,प्रा. किरण मोरे कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.