महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुक्त विद्यापीठातील योगा शिक्षक पदविकेचा शंभर टक्के निकाल
अहमदपूर ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या
मे २०२३ मध्ये झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात योगा शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या वर्गाचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेत महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे ८०.६७ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आले आहेत. तसेच डॉ.बी.के. मोरे यांना ७७.६७ तर डॉ.वसंत बिरादार यांना ७२ टक्के गुण प्राप्त होऊन विशेष प्राविण्यामध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत
या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील, संमंत्रक विशाल डुबेवार, विद्या मुंडे यांनी केले आहे.