बचपन आणि छञपती इग्लिंश स्कुलच्या वतीने आषाढी दिंडीचे आयोजन

बचपन आणि छञपती इग्लिंश स्कुलच्या वतीने आषाढी दिंडीचे आयोजन

शिरुर ताजबंद( गोविंद काळे ) बचपन आणि छञपती इग्लिंश स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्तानं विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली.या दिंडीत विद्यार्थ्यां विठ्ठल-रखुमाई,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत सावतामाळी,वारकरी,संत जना बाई,संत मुक्ताबाई,याची वेशभुषा करुण विद्यार्थी सहभागी झाले होते.प्रारंभी शाळेच्या संस्थाअध्यक्ष्या गिरीजाताई पाटील यांच्या हस्ते विठु माऊलीच्या प्रतिमेची पुजन करुन करण्यात आली.शाळेच्या मैदानात चिकुकल्याचे गोल रिंगण पार पडले,विठ्ठल नामाच्या जय घोषात आणि माऊली ..माऊली या गाण्यावर नृत्य,पाऊले,फुगडी खेळुन आंनद घेतला.अशा भक्ती मय वातावरण भक्तीरसात सारा परीसर न्हाऊन निघाले.या कार्यक्रमासाठी मुख्यध्यापिका शालिनी कुमठेकर,कु.यशदा पाटील आणि शाळेतील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यानी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!