साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
लातूर (प्रतिनिधी) : साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज 18 जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लातूर शहरातील साठे चौकातील साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाज बांधव व अण्णाभाऊ प्रेमींनी साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
यावेळी बोलताना सार्वजनिक जयंती चे अध्यक्ष संदेश अण्णा शिंदे म्हणाले की , साहित्यरत्न, ‘लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिनानिमित्त साठे चौकातील पुतळ्यास समाज बांधवांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. ते मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पीडित, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव त्यांनी साहित्यातून समोर आणले आहे त्यातूनच उपेक्षित समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा प्रत्येक संघर्षात सक्रिय भूमिका त्यांनी बजावली आहे.
महाराष्ट्रात वैचारिक, सामाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्याचं मोठं श्रेय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जातं. मराठी साहित्यातील कथा, कादंबरी, नाट्य, लोकनाट्य, लावणी, वग, गण, गवळण, पोवाडे, प्रवास वर्णन असे सर्व साहित्य प्रकार त्यांनी सशक्तपणे हाताळले. मराठी साहित्य, मराठी लोककला, मराठी लोकजीवन त्यांनी समृद्ध केले. तमाशासारख्या कलेला लोकनाट्य कलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात वैचारिक क्रांती घडवून आणणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि देशाचेही रत्न आहेत. त्यांनी साहित्यातून मानवतावादाचा, शोषण मुक्तीचा लढा जीवनभर लढला. आज, त्यांच्या स्मृतीदिनानिमितत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. 18 जुलै ते एक ऑगस्टपर्यंत विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत, असेही ते शेवटी म्हयावेळी
यावेळी सार्वजनिक जयंती चे अध्यक्ष संदेश अण्णा शिंदे, कार्याध्यक्ष विकास कांबळे ,अशोक देडे, सुनील बसपुरे, आनंद वैरागे, सुरेश चव्हाण, रघुनाथ कुचेकर ,जीए गायकवाड, पंकज शिंदे, मिथुन गायकवाड, दत्ता भुरे ,समुखराव सर, बापू मगर, माणिक पवार, शिवलिंग कांबळे, गणेश कांबळे, राहुल शिंदे, विकास कांबळे आदी समाजातील सर्व प्रमुख नेते आणि समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती.