शंकरराव बुड्डे अमृत कलश पुरस्काराने सन्मानित.
अहमदपूर, ( गोविंद काळे): तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील क्रीडा शिक्षक शंकरराव बुडे यांना अमृत कलश पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून प्रती वर्षी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने कबड्डी मधील खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ पंच, स्पर्धा आयोजक संस्था, ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येतो.
राज्य, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून केलेले उत्कृष्ट कार्य, राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन, राज्य व राष्ट्र स्तरावर खेळाडू घडविणे, तालुका स्तरावरील आदर्श क्रीडा व जिल्हा स्तरावरील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच खेळाडू निवड समिती सदस्य पदावर झालेली नियुक्ती या कार्याची दखल घेऊन त्यांना ठाणे येथील गडकरी रंगयतन सभागृहात हा पुरस्कार ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी वनमाने, बाबुराव चांदेरे, मंगल पांडे, शशिकांत गाडे, रवींद्र देसाई यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याने माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, प्रा.गणपतराव माने, श्रीरंग बंडपल्ले, धर्मपाल गायकवाड, लक्ष्मण सरोळे, डॉ.मनोज रेड्डी, प्रा.भास्कर माने, प्रा.अशोक जाधव,लक्ष्मण बेल्लाळे, किशनराव पाटील, सतीश लोभे, तुळशीदास रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लाकडे, चंद्रकांत लोदगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.