पालकांनी मुलींच्या समस्या समजून घ्याव्यातत्वचारोग तज्ञ डॉ. सोनल चामे यांचे प्रतिपादन

पालकांनी मुलींच्या समस्या समजून घ्याव्यातत्वचारोग तज्ञ डॉ. सोनल चामे यांचे प्रतिपादन
  अहमदपूर ( गोविंद काळे)  आज समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे परिवारातील सर्व सदस्य आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळे कुटुंबातील माता, पिता, पालकांनी आपल्या मुलींच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य उपाय योजना कराव्यात असे जाहीर आवाहन प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. सोनल चामे- कांडगिरे यांनी केले.
त्या दि. 17 रोजी यशवंत विद्यालयाच्या सभागृहात आयोजित किशोरवयीन मुलींच्या समस्या व समुपदेशन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हीलच्या अध्यक्षा शितल मालू, कोषाध्यक्ष वैशाली चामे, सुरेखा उगिले, रेखा बालुरे, अभियंता स्नेहा पोकर्णा, सुनीता गुणाले, जयश्री देशमुख मंजुषा फुलारी, वृषाली चवले, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी स्नेहा पोकर्णा  म्हणाल्या की गुड टच समजून घ्यावा, समोरच्याची दृष्टी समजून घ्यावी, मुलींनी शाळेत आणि समाजात वावरताना समजून वागावे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी केले तर आभार मधुबाला आंधळे यांनी मानले. कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार पाटील, कपिल बिराजदार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author