प्रा. अतुल पागे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ची पी एचडी पदवी प्रधान

प्रा. अतुल पागे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ची पी एचडी पदवी प्रधान

अहमदपूर ( गोविंद काळे) येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. अतुल अनंतराव पागे यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड चे प्राणीशास्त्रातील बकरीच्या आतड्यामधील जंतूचा शोध या विषयावर पी एच डी पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर हिवरे आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे जीवशास्त्र विषयाचे संचालक डॉक्टर शिवाजी चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
त्यांना नांदेड येथील यशवंत वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर धनराज भुरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते .
या नेत्र दीपक यशाबद्दल विचार विकास मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट किशनराव बेंडकुळे, सचिव एडवोकेट पी डी कदम, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्राचार्य अनिता शिंदे, उपप्राचार्य प्रभाकर बाबुळगावकर, उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे, प्रा. रत्नाकर नळेगावकर, रवींद्र क्षीरसागर यांच्यासह मित्रपरिवाराने अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author