यशवंत विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.
अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मराठी विभाग प्रमुख राम तत्तापुरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेद्येवाढ, सुनील धनुरे, प्रतिभा सोलपूरे, बालाजी माळी, राजेंद्र सूर्यवंशी, मारुती पवार, मुकरम सय्यद यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी आभार तर शिवाजी सूर्यवंशी यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.