विद्यार्थ्यांनी बालवयात स्पर्धा परीक्षेकडे वळून चिकित्सक अभ्यास करावाअधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी बालवयात स्पर्धा परीक्षेकडे वळून चिकित्सक अभ्यास करावाअधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये जीवघेणी स्पर्धा झालेली असल्याचे सांगून त्यात नेत्रदीपक भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बाल वयातच स्पर्धा परीक्षेची अत्यंत चिकित्सकपणे अभ्यासाकडे वळावे असे  जाहीर आवाहन जिल्हा शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण परिषदेतील अधिव्याख्याता डॉ. जगन्नाथ कापसे यांनी केले .
ते दि. 17 रोजी यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे हे होते तर  व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून  प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, बीआरसी चे विषय तज्ञ ज्ञानोबा सुक्रे, कामाक्षी पवार, सुरेश केंद्रे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, निर्मला पंचगंले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य ठेवून जिद्द,   चिकाटी, परिश्रम यांच्या जोरावर सर्वच क्षेत्रामध्ये यश प्राप्ती करावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी आभार राजकुमार पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author