बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातील जिव्हाळा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत – संचित बोरगावे

0
बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातील जिव्हाळा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत - संचित बोरगावे

बॅग ऑफ स्टोरीज म्हणजे नात्यातील जिव्हाळा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत - संचित बोरगावे

उदगीर (प्रतिनिधी) : आजी-आजोबा म्हणजे खेडेगावातल हासतं-खेळतं विद्यापीठ. जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्याची दिशा दाखवत संस्काराची पेरणी करणारे खरे मार्गदर्शक. अशा कितीतरी आठवणींची साठवण असलेली” बॅग ऑफ स्टोरीज” म्हणजे नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम वाढवणाऱ्या गोष्टींचा संग्रह होय, असे मत संचित बोरगावे याने व्यक्त केले.
शिवाजीराव जाधव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 325 व्या विशेष बाल वाचक संवादामध्ये संचित संध्याराणी रमाकांत बोरगावे या विद्यार्थ्याने सूधा मुर्ती लिखित ग्रॅन्ड पॅरेंन्ट्स बॅग ऑफ स्टोरीज या इंग्रजी साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधताना तो म्हणाला, वाचनाची सुरुवात करायची असेल तर हे पुस्तक वाचलं पाहिजे. नातेसंबंध जोडणे आणि नात्यातलं प्रेम वाढवण या गोष्टी शिकवणारे हे पुस्तक असून कोरोना काळात घडलेल्या घटनांचे संदर्भ देऊन आजी-आजोबांनी सांगितलेल्या या सगळ्या कथा आहेत.
वाचक संवादावेळी डॉ. दत्तात्रय देवकत्ते, माजी गटशिक्षणाधिकारी बालाजी बिरादार, प्राचार्य डॉ.शिवाजीराव सगर, तुळसीदास बिरादार , मोहन निडवंचे, गुंडप्पा पटणे यांचे सह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी अथर्व उगीले व कु. प्रगती मुंढे या दोन बाल वाचकांनीही त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल माहती सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना शिवाजीराव जाधव यांनी केला.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन मुरलीधर जाधव यांनी केले तर आभार प्रा. चिटगिरे आर.एस. यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *