संविधान धर्मनिरपेक्ष भारताचा ‘धर्मग्रंथ’ – बालासाहेब शिंदे
उदगीर (प्रतिनिधी) : भारत हे निधर्मी नव्हे; तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. येथे प्रत्येकाला आपल्या धर्माचे आचरण आणि प्रचार-प्रसाराचे संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे. आपल्या देशातील विविध धर्मियांचे धर्मग्रंथ त्या त्या धर्माच्या जीवन पद्धती सांगणारा दस्तऐवज असेल तर; भारतीय संविधान हे राष्ट्र उभारणीचा महामार्ग होय. राष्ट्रउभारणीसाठी सांसदीय लोकशाहीचा स्वीकार करत आपण कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या भूमिकेत न्याय मंडळ निर्माण केले आहे. असे प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले.
अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त जिजामाता प्राथमिक शाळा व तुकाराम नाईक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थापक अध्यक्ष तथा संस्था सचिव चव्हाण, मुख्याध्यापक संग्राम बंधू पवार, मुख्याध्यापक नवनाथ कसबे, मुख्याध्यापक डी.एन.कुंटे, केंद्रे , शिंदे , कांबळे, नाईक, चव्हाण, राठोड, अंकुशे , गायकवाड , महालिंगे , पाटील
आदिजण उपस्थित होते.