शेतकऱ्यांना उद्धवस्त करणाऱ्या हरणांचा बंदोबस्त करा अन्यथा कायदा हातात घेऊ-डॉ नरसिंह भिकाणे
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सोनखेड,मानखेड,पाटोदा,कोपरा,विळेगाव आदी अनेक गावांमध्ये शेकडो हरणांनी व डुकरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची पिके ,ऊस उद्धवस्त करत आहेत प्रशासनाने व वनीकरण विभागाने तात्काळ या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त करावा लागेल असा सज्जड इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी वनीकरण विभागाला दिला आहे
याविषयी सविस्तर माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील सोनखेड,मानखेड,पाटोदा,कोपरा, विळेगाव आदी अनेक गावांमध्ये शेकडो हरणांनी धुमाकूळ घातला असून नुकतीच मोड आलेली शेतकऱ्यांच्या पिकाची शेंडे खाऊन व पिकांवर बसून अक्षरशः शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त करत आहेत.तसेच डुकरांचे कळप ऊस खाऊन व उभा ऊस मोडून ऊस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत.प्रशासनाने व वनीकरण विभागाने तात्काळ ह्या हरणांचा व डुकरांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदा हातात घेऊन शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त करावा लागेल असा सज्जड इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी वनीकरण विभागाला दिला आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नुकसानाची नोंदणी केली असून वनीकरण विभागाने याचा पंचनामा करून लगेचच नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीचे निवेदनही यावेळी तहसील प्रशासन व वनीकरण विभागाला जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.खत बीबीयाने यांच्या दुप्पट किमती,त्यात ही बोगस कंपण्यांचे बियाणे उगवेल की नाही याची खात्री नाही,पाऊस खूपच कमी व त्यातून नशिबाने उगवले ते हरणांनी खाल्ले यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे व नेते मात्र पेंडुलम बनून राजकिय तमाशात व्यस्त आहेत असे मत डॉ भिकाणे यांनी पोलीस फ्लॅश न्युज शी बोलताना व्यक्त केले. यावेळी मानखेड सोनखेड ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,सदस्य बालाजी सांगुळे,सदस्य एम.एन.क्षीरसागर, माधव पांगरे,मदन करपुडे,दीपक नारागुडे,मनोहर नारागुडे,अभिजित भोसले,तुकाराम गिरी,ऋषी पांगरे,विपुल नारागुडे, धनंजय शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते.