आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातुन 23 कोटी रूपयांचा निधि मंजुर
अहमदपूर ( गोविंद काळे ) मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सत्तेतील सहभागानंतर दोन आठवड्यातच मतदारसंघात विकास कामाचा धडाका चालू झाला असून रस्ता मजबुतीकरण व विस्तारीकरणासाठी मंजूर झालेल्या 23 कोटी रुपयांमध्ये खालील कामे होणार आहेत. तालुक्यातील अंधेरी चिखली किनगाव गुंजोटी गोडाळा मार्गे जाणारा राज्य मार्ग 248 पिंपळदरी ते कारेपुर रस्ता रुंदीकरणासाठी 2 कोटी 25 लक्ष, राज्य मार्ग 268 वरील चाकूर, शेळगाव, किनी कद्दु, यल्लादेवी उमरगा, वाढवना, घोनसी, गुत्ती, अतनूर, धर्माबाद, मघोळ ते राज्य सीमा नाली बांधकाम तसेच रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 5 कोटी 10 लक्ष, थोडगा ते जिल्हा सरहद मार्गे सिंदगी या 56 किलोमीटर रस्ता सुधारणासाठी 3 कोटी, अजनसोंडा ते कलकोटी मार्गे बोरगाव रस्ता नूतनीकरण तसेच रुंदीकरणासाठी 5 कोटी, उजना ते हिंपळनेर मार्गे, खंडाळी, ढाळेगाव, वैरागड, विळेगाव, परचंडा, टाकळगाव, निंबवाडी, हिंपळनेर रस्ता सुधारणाणासाठी 10 कोटी रुपये.
मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते बऱ्याच वर्षापासून विविध कारणाने अडचणीचे ठरत होते तर काही ठिकाणी रस्ता मजबुतीकरण आजपर्यंत झालेच नव्हते. सदरील गावातील नागरिकांची रस्त्याची मागणी मागील बऱ्याच वर्षापासून होती. या नात्या अडचणीने या रस्त्याची कामे झाली नाहीत. मागील दोन-तीन वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करत असताना सुद्धा कामाला यश आले नाही, परंतु सत्तेत सहभागी होताच अवघ्या पंधरा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने 23 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी आणल्याने संबंधित गावातील नागरिक खुश आहेत.
सत्तेतील सहभागाशिवाय भरघोस निधी मिळणे अशक्य आहे. मतदारसंघातील विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठीच सत्तेत सहभागी होणे योग्य वाटले. सत्तेत सहभागी होऊन मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास साधणार असून जनसामान्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणार आहे… आ.बाबासाहेब पाटील.