शिक्षक समितीच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय फळ व बिस्किटे वाटप कार्यक्रम

शिक्षक समितीच्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय फळ व बिस्किटे वाटप कार्यक्रम

निलंगा (प्रतिनिधी) : त्याग,सेवा, न्यायायी चाड अन्यायाची चीड स्वाभिमानासाठी संघर्ष हे वाक्य उराशी बाळगून शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी कै.भा.वा.शिंपी गुरूजी यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती स्थापना केली. राज्याध्यक्ष विजयजी कोबे सर व जिल्हाध्यक्ष अरुण सोळूंके सर यांच्या सूचनेनुसार दि 22 जूलै 2023 रोजी शिक्षक समिती स्थापना दिनाच्या 61 व्या वर्धापनदिनी शाखा निलंगा जि. लातूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ग्रामीण रुग्णालय निलंगा येथील रुग्णालयातील रुग्णास फळ व बिस्किटे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रम डॉ रोहन पाटील, डॉ. गणेश पाटील यांच्या हस्ते शिंपी गुरूजीच्या प्रतिमेचे पूजन करून रुग्णास फळ वाटप करण्यात आले. यावेळे शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते बालाजी येळीकर सर, जिल्हा नेते संजय सुर्यवंशी सर, तालुकाध्यक्ष श्री. संजय कदम सर, सरचिटणीस श्री गणेश गायकवाड सर कार्याध्यक्ष विष्णूकांत धुमाळ सर, वाघमारे बी. जी. सर, कांबळे बी. पी. सर, वग्गे विजयकुमार सर, वसंत पाटील सर, तळेगावे विलास सर,पेठकर व्ही. डी. सर, धनाजी आर. बी सर,सुर्यंवंशी डी व्ही सर,इनामदार के. जे सर, राउत सी एम सर, गिरी एम बी., सहदेव माने सर,सुनील टोपी सर,राम सगरे सर, मोहन सावंत सर,कदम शिरीष,दरेकर एस. के सर, सुरेश जाधव,भास्कर सोळूंके,जाधव अनंत सर,दुड्डे किशोर सर,सुर्य़वशी एल के सर,सखाराम सुर्यवंशी सर,बुग्गे सर, संगनाळे श्रीमंत, पडलवार एस. एन सर,अशोक सुरवसे सर,ओम गेदेवाड सर,गेंदेवाड एस. डी. सर,महिला प्रतिनिधी श्रीमती पाटील अन्नपूर्णा ताई, रेखा बेवनाळे ताई, अनिता इज्जपवार ताई व तालुक्यातील बहूसंख्य शिक्षक समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author