शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी अतिवृष्टी झालेल्या गावातील बांधावर जाऊन केली पाहणी

शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी अतिवृष्टी झालेल्या गावातील बांधावर जाऊन केली पाहणी

उदगीर ( एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील,जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात अतिवृष्टी झालेल्या गावातील डोंगरगाव, मरसांगवी, रावणकोळा, अतनूर, गव्हाण, चिंचोली, मेवापूर गावातील अतिवृष्टी भागाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला.

यावेळी शेतकऱ्यांनी अनेक समस्या, गाऱ्हाणी, व्यथा मांडल्या. सर्व शेतकऱ्यांची व्यथा ऐकून शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी जळकोट तालुक्याचे तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांच्याशी दुरध्वनी वरून संवाद साधला. शेतकऱ्यांच्या पूर्ण समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या व तात्काळ पंचनामे करून ढगफुटी मुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. व अतनूर ते मरसांगवी गावाला जाण्यासाठी, ये-जा करण्यासाठी पूलाचे काम राहिले आहे. ते पुलाचे व नाल्याचे कामे तात्काळ पंचनामे करून करण्यास परवानगी द्यावी, व तात्काळ नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी केली आहे. नाल्याचे पाणी पूर्ण शेतामध्ये व गावात शिरले असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पेरलेल्या शेतातील पीक वाहून गेले, माती वाहून गेली, बांध फुटलेले आहेत. मरसांगवी गावातील तिन पुलाची काम व नदी आणि नाल्याचे गाळ काढून खोलीकरण केले असते तर आज पूर्णतः शेतातील माती व पिके वाहून गेली नसती, व शेतकऱ्यांना नुकसान झाले नसते. शेताला जाण्यासाठी तिरू नदी मधून जाण्यासाठी पुलाची काम अत्यंत आवश्यक असून तात्काळ मंजूर करून पुलाचे पण काम करून द्यावे. शेतकऱ्याला शेताकडे जाण्यासाठी रस्ता करून द्यावा. शेतकऱ्याला पाण्यामधून जावे लागत आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी ही मागणी शेतकऱ्यांनी केल.

यावेळी अतनूरचे कृषी सहायक संदीप पाटील, अतनूर सज्जाचे तलाठी अतिक शेख, शिवसेना तालुकाप्रमुख जळकोट मनमथ बोधले, जळकोट तालुका संघटक तथा जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुक्तेश्वर पाटील अतनूरकर, उपतालुकाप्रमुख तिरुपती पाटील, शिवसेना कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपतालुका प्रमुख विकास राठोड, विभाग प्रमुख देविदास घोडके, विभाग संघटक गोविंद बरसूळे, मरसांगवीचे सरपंच सौ.पुजा गोरखे, रवी गोरखे, सोसायटीचे चेअरमन उमाकांत ईमडे, उपचेअरमन सैलानी जमादार, बजरंग देवकते, सरदार भांडे, पुंडलिक देवकते, पाशा पटेल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About The Author