उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, जन्मअंधमुलीला मिळाली दृष्टी
उदगीर (प्रतिनीधी) : येथील उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाच्या वतीने लाखो नेत्र रुग्णाला दृष्टी देण्याचे कार्य झाले आहे. विशेष बाब म्हणजे नांदेड जिल्ह्य़ातील लोहा तालुक्यातील मस्की या गावातील सटवाजी ढवळे काही कामा निमित्त कंधार जांब प्रवास करत असताना ऑटो पलटी झाला व या आघातात सटवाजी ढवळे व त्यांच्या पत्नी रसिकाबाई डोळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा जखमी झाला. त्यामुळे तो आपंग झाला. सटवाजी ढवळे यांची मुलगी लक्ष्मी ढवळे ही जन्मजात मतिमंद होती. तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू होऊन दोन्हीही डोळ्यांची नजर कमी झाली होती. अशा परिस्थीतीत आर्थिक बाजू नसताना ऑपरेशन कसे होणार ? या भिती पोटी ऑपरेशन होत नव्हते. लक्ष्मीताई यांना दृष्टी कशी मिळेल असा प्रश्न पडला होता.त्यांना उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय उदगीर या संदर्भात माहिती मिळाली व त्यांनी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांना संपर्क साधून त्यांच्या परिस्थितीची माहिती दिली असता त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा डॉ रामप्रसाद लखोटीया यांनी लक्ष्मीताई ढवळे यांच्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास नेत्रतज्ञ अर्चना पवार यांना सांगीतले. व त्या मतिमंद मुलीच्या एका डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाली. व त्यांना दृष्टी प्राप्त झाली आहे, त्यामुळे उदगीर लायन्स नेत्र रुग्णालयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.