चोरीची जनावरे व वाहनासह 8,65,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
5 आरोपींना अटक जनावर चोरीचे चार गुन्हे उघड
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील सोयीच्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर चाकूर पोलिसांची रात्रगस्त करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत, चोरीची जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनासह जनावरे जप्त केले आहेत.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावरील पोलीस पोलिसाकडून आपापल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क रात्रगस्त करण्यात येत होती.
दरम्यान पोलीस ठाणे चाकूर हद्दीमध्ये रात्रगस्त करीत रात्रगस्त वरील पोलीस उपनिरीक्षक मोरे यांना झरी खुर्द गावाजवळ एक संशयास्पद पिकअप वाहन अतिशय वेगात दोन गाई घेऊन जात असल्याचे दिसले. त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, त्याने वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी सदरची माहिती चाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांना कळविण्यात आली. त्यावरून निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस ठाणे हद्दीमध्ये तात्काळ नाकाबंदी लावून सदर पिकअप वाहनाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने झरी गावातून सदरच्या गाई चोरल्याचे कबूल केले.
तसेच त्याच्याकडे आणखीन सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे चाकूर हद्दीमधील या अगोदर चार वेळा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याच्या इतर साथीदाराच्या मार्फतीने जनावरे चोरल्याचे कबूल त्यावरून आरोपी नामे ज्ञानोबा नागनाथ मोहाळे, (रा. कातकरवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड), मारुती दंतराव हरगिले, (रा. कासारवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी), राजू नारायण पोपतवार, (रा. लांजी ता.अहमदपूर जिल्हा लातूर),शेख कलीम शेख बुर्रहान कुरेशी, (रा. कुरेशी मोहल्ला, पूर्णा जिल्हा परभणी), इरफान उस्मानसाब कुरेशी, (रा. बागवान गल्ली, अहमदपूर जिल्हा लातूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरलेले 2 गाई, 2 म्हशी, 1 वासरू,1बैल असे एकूण 6 जनावरे व गुन्ह्यात वापरलेले दोन पिकअप वाहन असा एकूण 8 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.पोलीस ठाणे चाकूर येथील पोलिसांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्टरित्या तपास करून जनावर चोरीच्या चार गुन्ह्याची उकल करून 6 जनावरे व दोन वाहनासह 8 लाख 65 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर शहर निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरवाडे , पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अमलदार शिरसाठ, मस्के, वाघमारे, लांडगे, पेदे्वाड यांनी पार पाडली.