जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘ध्येयवेडे’ व्हा – पो.नि. परमेश्वरजी कदम

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर 'ध्येयवेडे' व्हा - पो.नि. परमेश्वरजी कदम

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात व प्रत्येक देशाच्या इतिहासात ‘नेतृत्व’ क्षमतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांच्या ठायी नेतृत्व क्षमता आहे ,अशाच माणसांनी देश मोठा केला आहे, असे प्रतिपादन उदगीरचे शहर पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले.

येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी वर्ग प्रतिनिधी मंडळाच्या नेतृत्व विकास शिबीराच्या उद घाटन प्रसंगी ऊद् घाटक म्हणून ते बोलत होते. या शिबीराच्या उद् घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय कुलकर्णी तर प्रमुख अतिथीस्थानी संकुलाचे कार्यवाह तथा केंद्रीय सदस्य शंकरराव लासूणे , शिबीर निरीक्षक सुरेश तपोवनकर,मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड ,उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

शिबीराच्या प्रारंभीच इरशाळवाडीच्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दुसऱ्या सत्रात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख व्याख्याते उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांनी विषय मांडणी केली.महान मानवांचा प्रदेश म्हणजे मराठवाडा, मराठवाड्याची वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक व अध्यात्मिक इतिहास, मराठवाड्याची भौगोलिक माहिती , निजामाची जुलमी राजवट याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषेत माहिती दिली.यावेळी या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे उपस्थित होते.
तिसऱ्या सत्रात विद्यालयातर्फे सहभोजनाचे आयोजन केले होते.

समारोपसत्रात माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे उपस्थित होते तर प्रमुख अतिथीस्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी नगर रचनाकार मयूर शिवशेट्टे उपस्थित होते.

प्रमुख अतिथी नगररचनाकार मयूर शिवशेट्टे यांनी व्यावसायिक आव्हाने पेलताना शालेय जीवनात मिळालेल्या संस्काराचा व नेतृत्वविकसनाचा उपयोग कसा झाला, हे अनेक उदाहरणाने पटवून दिले.अध्यक्षीय समारोपात सतनप्पा हुरदळे यांनी शिबीर आयोजनाचे कौतुक करत आजचे शिबिरार्थी उद्याचे नेते असतील,असे नमूद केले.

या शिबीराच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले माधव मठवाले ,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार ,मिनाक्षी कस्तूरे व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About The Author