‘मराठवाडा मुक्तीसंग्राम’ म्हणजे अन्यायी राजवटीविरूद्धचा जाज्वल इतिहास – प्राचार्य राजकुमार मस्के

'मराठवाडा मुक्तीसंग्राम' म्हणजे अन्यायी राजवटीविरूद्धचा जाज्वल इतिहास - प्राचार्य राजकुमार मस्के

उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात आयोजित नेतृत्व गुणविकास शिबीराच्या दुसऱ्या सत्रात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख व्याख्याते उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के यांनी विषयमांडणी केली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक विभागाचे शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, प्रमुख उपस्थिती केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शंकरराव लासूने व प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड उपस्थित होते.

“महान मानवांचा प्रदेश म्हणजे मराठवाडा, मराठवाड्याची वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक व अध्यात्मिक इतिहास, मराठवाड्याची भौगोलिक माहिती , निजामाची जुलमी राजवट याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषेत माहिती डॉ.राजकुमार मस्के यांनी सांगितली.तसेच आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक याविषयीचे गुण सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी व्यंकटराव गुरमे यांनी रजाकाराचा जुलमी काळ स्पष्ट केला.भविष्यातील उत्तम नागरिक आपल्या शाळेतून अशा प्रकारच्या शिबिरातून घडतात असे सांगितले.

सूत्रसंचालन व स्वागत परिचय अंबिका ढोबळे,प्रास्ताविक पूजा डावले,आभार अनघा बिरादार , वैयक्तिक पद्य प्रीती शेंडे यांनी सादर केले.

About The Author