शिक्षक हेच खरे मार्गदर्शक — मयूर शिवशेट्टे
उदगीर (एल.पी.उगीले) येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात आयोजित समारोप सत्र प्रसंगी उदगीर नगरीचे सहाय्यक नगर रचनाकार आणि या शाळेचे माजी विद्यार्थी मयूर शिवशेट्टे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सतनप्पा हुरदळे,शिबिर निरीक्षक प.पू.गोळवलकर गुरुजी विद्यालय देगलुर येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश तपशाळकर, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड,उप मुख्याध्यापक संजय कुलकर्णी या प्रसंगी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक मयूर शिवशेट्टे म्हणाले की, अशा शिबिरातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, आणि नेतृत्वकला अंगी जोपासली जाते.शिक्षक हेच आपल्या आयुष्यात खरे मार्गदर्शक असतात, असे सांगितले.मुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांनी ही विद्यार्थी शिस्त बाबतीत कौतुक केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी सतनप्पा हुरदळे असे म्हणाले की, नेतृत्व गुण विकास शिबिर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरते.
अहवालवाचन अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,विद्यार्थी मनोगत मधुरा तेलंगे आणि सायली कुलकर्णी,वैयक्तिक गीत सिद्धांत व वेदांत मोरखंडे, सूत्र संचालन साक्षी चिखले,स्वागत परिचय संस्कृती सुर्यवंशी,आभार प्रांजल पाटील,पसायदान श्रुती पाटील हिने गायले.