लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी – शेतकरी नेते सचिन दाने

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी - शेतकरी नेते सचिन दाने

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२३ सालचा पीकविमा भरण्यास अनेक अडचणी येत आहेत .गेल्या आठ दिवसांपासून सर्वर बंद आहे, रक्कम भरण्यास, डाटा अपडेट होण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.त्यामुळे पीकविमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकरी नेते सचिन दाने यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना केली. पावसामुळे शेतातील कामे प्रलंबित असल्यामुळे शेतकरी शेतातल्या कामात व्यस्त आहेत .कमी जास्त पाऊस, इंटरनेट सुविधा, अनियमित वीज पुरवठा,अशा अनेक कारणांमुळे, लातूर जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पीकविमा प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात.या मागणी संबंधीचे निवेदन लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांना शिवसेना मा उपजिल्हाप्रमुख, शेतकरी क्रांती आंदोलन चे संस्थापक अध्यक्ष सचिन दाने यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले. ही शेतकऱ्यांची न्याय मागणी असून सकारात्मक विचार करून तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकरी नेते सचिन दाने यांनी दिला आहे.यावेळी सचिन दाने, नितीन औसेकर, धनंजय भिसे, शुभम लोखंडे, नवनाथ पाटील व शेतकरी उपस्थित होते.

About The Author