मतदार संघातील २४.८० कि.मी. च्या रस्त्यासाठी १८ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजू
उदगीर (प्रतिनिधी) : मतदार संघाचा भौतिक विकास करताना ग्रामीण भागातील जनतेला केंद्रबिंदू समजून प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहण्यासाठी शहराला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील २४.८० कि.मी. च्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत ग्रामविकास विभागाकडून एकुण १८ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
उदगीर व जळकोट तालुक्याला ये – जा करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत होती. ग्रामीण भागातील जनतेचा त्रास ओळखून ना.संजय बनसोडे यांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातील एकुण ६ रस्त्यासाठी ज्याची लांबी २४.८० कि.मी. असुन सदर रस्त्यांची दुरावस्था झाली होती ते रस्ते शासन दरबारी नेवुन त्यास भरघोस निधी उपलब्ध करुन घेतला आहे. त्यामध्ये उदगीर तालुक्यातील दावणगाव ते येणकी या ५ कि.मी. च्या रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लक्ष रु., प्रजिमा-३१ ते आडोळ तांडा या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी २५ लक्ष रु, जळकोट तालुक्यातील मरसांगवी चतरु तांडा ते रावणकोळा या ५ कि.मी. रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लक्ष रु, रामा – २६८ ते धोंडवाडी – धर्मातांडा – रुपला तांडा या ५.६० कि.मी रस्त्यासाठी ४ कोटी २० लक्ष रु, इजिमा -५४ ते जिल्हा सरहद्द दापका रस्ता ३.२० कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ४० लक्ष रु, इजिमा -५४ ते जळकोट तांडा या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी २५ लक्ष रुपये असे उदगीर व जळकोट मतदार संघातील रस्त्यसाठी ना.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास विभागाकडून १८ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन घेतल्याने ना.संजय बनसोडे यांचे ग्रामीण भागातील जनतेने आभार व्यक्त केले आहेत.