तालुक्यातील पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करा
प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी
उदगीर (प्रतिनिधी) : प्रहार जनशक्ती पक्ष उदगीरच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने उदगीर तालुक्यातील सोयाबीन पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा.
उदगीर तालुक्यात गेल्या महिन्या भरापासून पाऊस गायब झाला आहे,हाताला आलेले पीक,तोंडाशी आलेली पिके वाया जात आहेत,तरी तात्काळ पिकांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 हजार रुपये आर्थिक मदत करावी,व सतत 27 ते 28 दिवस पाऊस पडले नसल्याने शेतकऱ्यांना त्वरित विमा द्यावा.अशा मागणीचे निवेदन उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी ग्रामीण जिल्हाप्रमुख कांचन भोसगे, उदगीर तालुकाध्यक्ष विजयमाला पवार ,उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, तालुका सचिव अविनाश शिंदे, तालुका संघटक सोपान राजे, शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे, शहराध्यक्ष जयश्रीताई पाटील, शहर उपाध्यक्ष रेखा गोविंदवाड यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.