करडखेल येथील पंचशील बौद्ध विहार बांधकामाचे ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन

करडखेल येथील पंचशील बौद्ध विहार बांधकामाचे ना.संजय बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे करडखेल येथील पंचशील बौद्ध विहार बांधकामास डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत यापुर्वी 20 लक्ष रुपयाचा निधी जाहीर केला होता,आता पुन्हा 25 लक्ष रुपये असे एकूण 45 लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी मंजूर करून दिला असून यापुढे ही उर्वरीत कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. असे आश्वासनही ना.बनसोडे यांनी उपस्थित मान्यवरांना दिले असुन करडखेल येथे थोड्याच दिवसात अतिशय देखण्या बौद्ध विहाराचे बांधकाम होणार असल्याचे या भागातील समाज बांधव सांगत आहेत. मौ.करडखेल ता.उदगीर येथे पंचशील बौद्ध विहार बांधकामाचे भुमीपुजन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी भंन्ते नागसेन बोधी,
करडखेलच्या सरपंच सौ.सुवर्णा मोमले, उपसरपंच सौ.सुनंदा मुळे, बाळासाहेब मुळे, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद कानुरे, प्रशांत कांबळे, मोहन कांबळे,मालुश्वरी कांबळे, सुभाष कांबळे, बालाजी कांबळे,वर्धराज कांबळे, अविनाश बेळकुंदे, अविनाश सुर्यवंशी, ग्रामसेवक संतोष माचे,शुभम भुमणे, सतीश गायकवाड यांच्या सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!