शिक्षकांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार – टीम आय आय बी

शिक्षकांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणार - टीम आय आय बी

देशातील पहिलाच स्तुत्य उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : आय आय बी इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी आता आय आय बी घेणार असून त्यांच्यासाठी 1 ऑक्टोबर पासून स्वतंत्र बॅच सुरू करण्यात येणार असल्याचे एकता पुरस्कार प्राप्त आय आय बी चे संचालक प्रा. चिराग सेनमा यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पालकांशी संवाद कार्यक्रम प्रसंगी घोषणा करून उपस्थितांना सुखद धक्का दिला.

5 सप्टेंबर हे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आय आय बी इन्स्टिट्यूट च्या वतीने पालकांशी संवाद साधून पालकांचे म्हणणे ऐकून घेतले, यावेळी विशेषत्वाने देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचीच आपल्या पाल्याप्रती चिंतीत असल्याचे चिराग सरांच्या निदर्शनास आले, तेव्हाच सम्पूर्ण समाजाच्या जडणघडणीची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी आय आय बी इन्स्टिट्यूटचे संचालक चिराग सेनमा यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श ठरणारी संकल्पना मांडली. शिक्षणामध्ये फक्त व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या सामाजिक भावनेतून शिक्षकांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याच्या संकल्पनेचा सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या इन्स्टिट्यूट च्या नवीन व कौतुकास्पद संकल्पनेचे स्वागत करून, सर्व शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. व चिराग सरांचे व टीम आय आय बी चे शिक्षकाप्रती असलेला आदरभाव दिसून येत असल्याचे मत शिक्षक वर्गातून व्यक्त केले जात होते. याबरोबरच शिक्षक व त्यांच्या पाल्यांसाठी असा अभिनव उपक्रम राबविणारी आय आय बी ही देशातील पहिली संस्था व प्रा. चिराग सर हे पहिले संचालक असल्याचे शिक्षकानी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.

About The Author