लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिली,दुसरी व तिसरी,चौथी विभागात कलोपासक मंडळातर्फे गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्कार केंद्रप्रमुख अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीर येथील न्यायालयातील न्यायाधीश केदार पोवार यांच्या पत्नी तथा माता पालक सौ.सायली पोवार तर,प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती निताताई वट्टमवार व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर पाहुण्यांचे शाल व गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. सायली पोवार यांनी धर्मावर विजय मिळवण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यांनी भगवद्गीतेतून सर्व जगाला चांगले उपदेश केलेले आहेत.संपूर्ण आयुष्याचे सार म्हणजेच भगवद्गीता होय.सर्वांनी आयुष्यामध्ये भगवद्गीता वाचलीच पाहिजे.त्यातून आपल्याला योग्य संस्कार व मार्गदर्शन मिळते.श्रीकृष्णाच्या अनेक कथा आहेत, लिला आहेत.सर्वांनी जास्तीत जास्त ज्ञान मिळवून पुढे जावे, व कृष्णासारखे जीवन आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा,असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणामध्ये संस्कार केंद्रप्रमुख अंकुश मिरगुडे यांनी गोपाळकाला व दहीहंडीचे महत्व सांगितले. मैत्री असावी तर कृष्ण सुदामासारखी असावी. सर्वांनी आयुष्यभर आपली मैत्री जपावी.असे सांगितले.
शाळेतील तिसरी चौथीच्या मुलींनी टिपरी नृत्य सादर केले.श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्या बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला. गोपाळकाला व दहीहंडी उत्सवासाठी अनेक विद्यार्थी श्रीकृष्ण,पेंद्या व राधाच्या वेशभूषेमध्ये आलेली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीदेवी कांबळेबाईंनी केले तर,स्वागत व परिचय श्रीमती निताताई वट्टमवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करून करण्यात आली.

About The Author