50 हजार रुपये खंडणीची मागणी गुन्हा दाखल

50 हजार रुपये खंडणीची मागणी गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरालगत येनकी मानकी रोडवर चालू असलेल्या बियर बार ला चालूच ठेवायचे असेल तर, खंडणी म्हणून 50 हजार रुपये द्या. अन्यथा तुमचा बार तुम्ही कसा चालवता? तुम्ही इथे राहताच कसे ? असे म्हणून धमकी दिल्यामुळे एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन येथून हाती आलेली माहिती अशी की, येनकी मानकी रोडवर राहणाऱ्या विमलबाई बाबुराव कांबळे (वय 50 वर्ष) यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली की, उदगीर येथील संतोषी माता नगर येथे राहणारे बालाजी लक्ष्मणराव भोसले यांनी येनकी मानकी रोडवरील बियर बार तुम्ही चालवता, तो बियर बारपूर्वक चालू ठेवायचा असेल तर खंडणी म्हणून 50 हजार रुपये द्या. अन्यथा तुम्हाला बार चालू देणार नाही. इतकेच नाही तर तुम्हाला येथे राहू सुद्धा देणार नाही. अशी धमकी दिल्या प्रकरणी गु.र.न. 541/ 23 कलम 384, 506 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

About The Author