विद्यार्थ्यांनी बालवयातच अभ्यासासोबत साहित्याकडे वळावे – गणेशदादा हाके यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी बालवयातच अभ्यासासोबत साहित्याकडे वळावे - गणेशदादा हाके यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : अनुभवामृत मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्त होता येणार आहे. साहित्य क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यासाठी विद्यार्थ्यांनी बालवयातच अभ्यासासोबत साहित्या कडे वळावे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके पाटील यांनी केले. ते दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी संत ज्ञानेश्‍वर विद्यालयाच्या वतीने आयोजित पालक मेळावा व अनुभवामृत मासिकाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय स्थानावरुन बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, अनुभवामृतचे अतिथी संपादक हरिदास तम्मेवार, साहित्यिक मोहिब कादरी, मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे, केंद्रप्रमुख बालाजी शिंदे, डॉ. मारोती कदम, प्रा.हनुमंत देवकते, उपक्रमशील शिक्षक राम तत्‍तापुरे, प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर, डॉ. शरद करकनाळे, योगशिक्षीका कलावती शिवमुर्ती भातांब्रे, आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे म्हणाले की, आजचे पालक बालकावर आपले विचार लादत आहेत. कमी गुण घेतलेला विद्यार्थीही जीवनामध्ये यशस्वी होतो असे सांगितले. यावेळी साहित्यिक मोहिब कादरी, अनुभवामृतचे अतिथी संपादक हरिदास तम्मेवार, मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे, उपक्रमशिल शिक्षक डॉ. मारोती कदम, तसेच पालकां मधून रहिमत पठाण , प्रा.एस बी ओव्होळ , अंगद कांबळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. शाळेच्या वतीने दर महिन्याला प्रकाशित होणारे अनुभवामृत या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे -तत्‍तापुरे यांनी केले. सुत्रसंचलन सौ. संगिता आबंदे व युवराज मोरे यांनी तर आभार मुख्याध्यापक मीना तौर यांनी मानले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या प्रसाद बैकरे ,समाधान इमडे,पार्थ दिक्कतवार, वेदांत कलवले, पूर्वी दिक्कतवार या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षेकत्‍तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author