समाजाने शिक्षकाप्रती आधाराची व सन्मानाचे भावना ठेवावी – डी बी लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन

समाजाने शिक्षकाप्रती आधाराची व सन्मानाचे भावना ठेवावी - डी बी लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून शिक्षकांना अत्यंत मानाचे स्थान असल्याचे सांगून समाजामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत शिक्षक हा प्रबोधनाचे काम करतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपरंपरेविषयी आदराची व सन्मानाची भावना ठेवावी असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षणमहर्षी डी बी लोहारे गुरुजी यांनी केले. ते दि. पाच रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, सौ पुष्पाताई लोहारे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, अधीक्षक सोमनाथ स्वामी, राम तत्तापुरे, अरुण मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठी विभाग प्रमुख राम तत्तापुरे म्हणाले की, शिक्षक हा जीवनभर निस्वार्थपणे विद्यार्थी घडवण्याचा प्रामाणिक करतो. म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेत ज्ञान घेऊन आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले. या समयी सुनील धनुरे, गुरप्पा बावगे, भीमराव कांबळे, शरद करकनाळे, गौरव चवंडा यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक हिंगणे यांनी तर आभार अरुण मोरे यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author