इच्छापूर्ती हनुमान मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा

इच्छापूर्ती हनुमान मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील न्यू शॉपिंग सेन्टर येथे असलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिरात दि. 6 रोजी रात्री 12 वाजता कृष्णजन्माचा सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी भजन, कृष्ण पूजन, पाळणा आणि रात्री 12 वाजता जन्माचा उत्सव गुलाल उधळून करण्यात आला.

यावेळी आशा नागठाणे, बेबीताई भूतडा, सविता कोटलवार, स्वाती शेटकार, नागिन खोंडे, सुरेखा गादेवार, रेखा साबणे, पूजा नागठाणे यांच्यासह रमाकांत नागठाणे, राम तत्तापूरे, हरी कोटलवार, उमाकांत कोणाले, गिरीश शेटकार, गजानन आंधळे, मोहन पारील, तुकाराम साबणे, दिलिप गादवार, किशन खोंडे यांच्या कॉलनीवासिय मोठया प्रमाणात उपस्थित होते. पूजापठण व सुत्रसंचालन पूजारी प्रविण कुलकर्णी यांनी तर उपस्थितांचे आभार राम तत्तापूरे यांनी. महाप्रसाधनंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!