बुद्धवासी बाबासाहेब भालेराव यांच्या शोकसभेनिमित्त बुद्ध स्मशानभूमीत वृक्षारोपण

Written by

in

धाराशिव (प्रतिनिधी) बुद्धवासी बाबासाहेब महादेव भालेराव यांच्या तिसऱ्या दिवसाच्या शोकसभा व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध स्मशानभूमी, धाराशिव येथे करण्यात आले. यावेळी दिवंगत बाबासाहेब महादेव भालेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बुद्ध स्मशानभूमी, धाराशिव येथे वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर आधारित धम्मदेशना देण्यात आली. जीवन हे अनित्य असून संसाराचा नियम परिवर्तनशील आहे. या जगात जो जन्माला आला आहे, त्याचे जाणेही निश्चित आहे. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगी तथागत बुद्धांच्या विचारांचा आणि धम्माचा आधार घेऊन जीवन जगावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

“संसाराचा नियम परिवर्तनशील आहे. जो जन्माला आला आहे, त्याचे जाणे निश्चित आहे,” या विचारांतून जीवनातील अनित्यतेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

दिवंगत बाबासाहेब महादेव भालेराव यांच्या स्मृती जतन करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असून, निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

बाबासाहेब महादेव भालेराव यांच्या निधनामुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती तथागत गौतम बुद्धांनी कुटुंबीयांना द्यावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमात धम्मविचारांना उजाळा देत दिवंगत बाबासाहेब महादेव भालेराव यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *