माकेगावचे सुपुत्र विजय लहाने यांची मंत्रालयात सहसचिव पदी पदोन्नती
अहमदपूर (गोविंद काळे) : रेणापूर तालुक्यातील माकेगाव गावचे सुपुत्र आणि मंत्रालय सार्वजनिक आरोग्य विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले विजय लक्ष्मणराव लहाने यांची सहसचिव पदी पदोन्नती करण्यात आले आहे. माकेगाव तालुका रेणापूर गावचे मूळ रहिवासी असलेले विजय लक्ष्मणराव लहाने यांचे प्राथमिक शिक्षण माकेगाव येथेच झाले तर माध्यमिक शिक्षण परभणी येथे झाले परभणी च्या कृषी विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 1997 मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. त्यानंतर गृह विभागात तसेच ग्रामविकास कृषी विभाग नियोजन विभागात उपसचिव म्हणून काम करत असताना त्यांची आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. एक अभ्यासू आणि प्रशासकीय कार्यपद्धतीची अचूक जाण असणारे अधिकारी म्हणून श्री विजय लक्ष्मणराव लहाने यांचा लौकिक आहे. श्री विजय लहाने यांच्या पदोन्नती बद्दल माकेगाव व जिल्ह्याच्या विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माकेगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.