उदयगिरीच्या विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद

उदयगिरीच्या विद्यार्थ्यांनी साधला शास्त्रज्ञांशी संवाद

उदगीर- येथील मराठी विज्ञान परिषद व उदयगिरी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद शास्त्रज्ञांची’ व्याख्यानमालेत राष्ट्रीय कृषी अन्न जैवतंत्रज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ.शिवराज निळे व केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हैसूर येथील शास्त्रज्ञ व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.तानाजी कुद्रे यांचे जैव शास्त्रातील विविध संशोधन संधी, जीवरसायन, जैवतंत्रज्ञान, टिशू कल्चर, वैद्यकीय क्षेत्र या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय संस्थांची माहिती यावेळी दिली. उभयतांचा संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, डॉ.बी.एम.संदीकर, प्रा.डॉ. बी.डी.करंडे, प्रा.डॉ..व्ही.एस.नागपूर्णे, प्रा.डॉ.बी.एस.होते, प्रा.डॉ.एन.डी.वगशेट्टी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सध्याच्या काळामध्ये बहुविद्याशाखीय संशोधन होणे आवश्यक आहे व आपण केलेल्या संशोधनाला बाजारपेठेमध्ये किंमत असली पाहिजे. स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित केल्यासच रोजगाराची संधी मिळू शकते अशा भावना उभय वक्त्यांनी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.राहुल अल्लापुरे यांनी केले.

About The Author