मातृभूमि महाविद्यालयाची फिट इंडिया फ्रीडम रन दौड

मातृभूमि महाविद्यालयाची फिट इंडिया फ्रीडम रन दौड

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील मातृभूमि महाविद्यालय मार्फत स्वच्छ भारत स्वस्थ भारत अंतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन ‘ या दौड चे आयोजन करण्यात आले होते . छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आय. टी. आय. महाविद्यालय पर्यंत निघालेल्या या फिट इंडिया फ्रीडम रन (दौड) ची सुरुवात तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दाखविलेल्या हिरव्या झेड्याने करण्यात आली .
यावेळी तहसीलदार गोरे यांनी सर्व तरुणांनी आपल्या आरोग्यासाठी दररोज धावण्याचा सराव केला पाहिजे , यामुळे आरोग्य चांगले राहतेअसे सांगितले . या दौड मध्ये प्रथम आलेल्या प्रवीण राठोड आणि द्वितीय आलेल्या वैष्णवी बिरादार या विद्यार्थ्यांचा प्र.प्राचार्य मनोज गुरुडे आणि उषा कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव उषा कुलकर्णी ,प्र प्राचार्य डाॅ मनोज गुरुडे, प्रा बिभीषण मद्देवाड , उषा सतालकर , प्रा.रणजित मोरे , प्रा.राजेश चटलावार, ओंकारे जगदीशा, मारुती जायभाये , पोलीस हावलदार पुट्टेवाड , विनायक चव्हाण, महेश मुसळे, अक्षय मंडलापुरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author