लव कुश प्राथमिक विद्यामंदिरात कुमारी पूजन आणि भ्रूणहत्या विरोधात भारुड
उदगीर (एल.पी.उगीले) – : नवरात्री निमित्याने येथील लव कुश प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थिनीचे कुमारी चे पाद्यपूजन करून ओटी भरण्यात आली . यावेळी सर्व विद्यार्थिनींना वही , पेन देण्यात आले .
देवी पूजन करताना विशेष महत्त्व असते ते कुमारिका पूजनाला. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. यामुळे शालेय विद्यार्थिनीचे शहरातील काही महिलांनी आणि शिक्षिकानी मिळून कुमारी पूजन अर्थात पाद्य पूजन (पाय धुवून हळद कुंकू पायाला लावण्याची क्रिया) करून शाळेतील मुलासमोर स्त्री रूपातील बालिकाही सन्मानास पात्र असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले .
देवीच्या विविध नऊ रूपातील महत्व सांगणारे गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी नेहा जोशी यांनी लेक वाचवा अशी जनजागृती करणारे स्त्रीभ्रूण हत्या विरोधातील भारुड सादर केले . अंबाजोगाई येथील वंदना जोशी लिखित लेक वाचवा हे गर्भातील स्त्री बाळ आपल्या आईला मला जन्म घेवू दे म्हणून विनविणारे भारुड ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिता दुंपलवार , प्रमुख पाहुणे नेहा जोशी , अंजली जोशी उपस्थित होते .ज्योती जोशी यांनी सुत्रसंचलन केले . यावेळी अंबिका घनपाठी , मंजुषा अनंतवाड ,दामिनी कुलकर्णी यांच्यासह शिक्षक ,पालक ,विद्यार्थी
उपस्थितीत होते .