“ऑटो चालकास उच्च न्यायालयाचा दिलासा.”

"ऑटो चालकास उच्च न्यायालयाचा दिलासा."

छत्रपती संभाजी नगर (एल.पी.उगीले) : जळकोट पोलिसांनी दाखल केलेल्या 100 क्विंटल सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यात मा. उच्च न्यायालयाचे न्या. एस. जी. चपळगावकर यांनी जामीन देऊन दिलासा दिला आहे. थोडक्यात माहिती अशी कि, फिर्यादी परमेश्वर डांगे यांनी जळकोट पोलिस ठण्यात त्याचा सलगडी गजानन वंजे याने 100 क्विंटल सोयाबीन गोडामातून चोरून नेऊन आडत बाजारात विकले, सदर विक्री करत असताना सालगड्याने आरोपी गणेश जोते याचा ऑटो भाड्याने घेतला होता, म्हणून सदर ऑटो चालक जेल मध्ये होता. तथापि अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात जामीन दिला नाही, सदर नाराजीने आरोपीने उच्च न्यायालयात ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला, अड.रेड्डी यांनी अर्जदार आरोपी केवळ उदर निर्वाह करिता ऑटो चालवत होता, मुळ आरोपी फरार असून त्याने विक्री केलेले सर्व पैसे उचल घेतली असल्याबाबत आडत्याने जबाब दिला आहे, तसेच स्वतः सालगडी हा त्याच्या मालकाचा माल विकत असल्याने, आटोचालकास मुख्य आरोपीने मालकाच्या परवानगी ने माल विकत असल्या बाबतचा भास निर्माण केल्याची दाट शक्यता आहे. अशी वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली. सुनावणी अंति उच्च न्यायालयाचे न्या. एस. जी. चपळगावकर यांनी जामीन देऊन दिलासा दिला आहे. ऍडव्होकेट अजिंक्य रेड्डी यांनी केलेल्या युक्तिवादाबद्दल अभिनंदन केले जात आहे.

About The Author