पोलीस प्रशासनाच्या रक्तदान शिबिराला उदगीरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 225 रक्तदात्यांनी केले रक्तदान
उदगीर (एल.पी. उगिले) उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या उदगीर शहर पोलीस स्टेशन आणि उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी जनतेला रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. विशेष म्हणजे या रक्तदान शिबिराला संयुक्त विद्यमान म्हणून रोटरी क्लब ने ही आपला वाटा उचलला होता प्रत्येक रक्तदात्याला त्यांच्या जीवाच्या संरक्षणासाठी हेल्मेट भेट दिले आहे. उदगीर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जेष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि लोकाभिमुख पोलीसिंग मुळे लोकांनीही त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिर यशस्वी केले आहे. उदगीर शहरातील हे सर्वात मोठे रक्तदान शिबिर म्हणून नोंद केली जाऊ शकते. या रक्तदान शिबिरासाठी शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले त्यासोबतच रोटरी क्लब आणि इतरही स्थानिक च्या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन हे शिबिर यशस्वी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांनी उदगीरच्या जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच अत्यंत भावनिक पणे आवाहनही केले आहे, प्रत्येक दुचाकी स्वारांनी गाडी चालवत असताना हेल्मेट वापरावे. हेल्मेट हे आपल्या जीवनाचे कवच आहे. पोलीस सांगतात म्हणून नव्हे तर आपल्या परिवाराची काळजी म्हणून हेल्मेट वापरा, या शिबिरात रक्तदान करणाऱ्यांना रोटरी क्लबच्या वतीने मोफत हेल्मेट भेट दिली आहे, त्याचा योग्य वापर लोक करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
