महात्मा फुले महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय खेळाडूंचा गौरव
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्सीखेच या स्पर्धेत मुलीच्या व मुलांच्या संघांनी तृतीय स्थान मिळवून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिक्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला असून रस्सीखेच स्पर्धेतील घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक प्रो .डॉ. अभिजीत मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात केला.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री. मधुकरराव बापुराव पाटील खतगावकर महाविद्यालय, शंकरनगर जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धेत अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींच्या व मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा लौकिक वाढविला आहे.
मुलींच्या संघामध्ये गुळवे दिव्या, कांबळे अंकिता, जाधव अंकिता, पटवारी दुर्गा, शिंदे प्रिया, गायकवाड अस्मिता, गायकवाड महानंदा, नागरगोजे वैष्णवी, मचकंटे ज्योत्स्ना, सोळुंके गीता, गिरी अश्विनी, राठोड कविता, बोडके ऐश्वर्या या विद्यार्थिनींचा समावेश होता. तर मुलांच्या संघामध्ये कांबळे संघरत्न, सावंत रोहन, मुंडे विशाल, दोडे करणसिंग, सुरनर काकणाजी, शेख अल्ताफ, पवार अंकुश, शेख समीर, बनसोडे रमणदीप, भगनुरे गोविंद, लामतुरे राहुल, ढवळे भैय्यासाहेब या खेळाडू विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांचाही महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ. अनिल मुंढे, डॉ. सीमा उप्पलवार, प्रा.कल्पना कदम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .