अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाला नॅकचा ‘बी प्लस’ ‘ दर्जा प्राप्त

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाला नॅकचा 'बी प्लस' ' दर्जा प्राप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे नुकतेच बेंगलोरच्या नॅक कमिटीकडून दुसऱ्यांदा नॅक मूल्यांकन झाले असून, सेकंड सायकल मध्ये महाविद्यालयाला नॅकचा ‘बी प्लस’ दर्जा प्राप्त झाला असल्याने आता ‘विश्वास वही…पहचान नई’ अशी महाविद्यालयाची ‘मुद्रा’ निर्माण झाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांमध्ये ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण करणाऱ्या महात्मा फुले महाविद्यालयाचे यु.जी.सी.च्या बेंगलोर येथील नॅक कमिटीने सेकंड सायकल अंतर्गत मूल्यांकन केले व महाविद्यालयाला सी.जी.पी.ए. २.७ गुण मिळवून ‘बी. प्लस ‘ हा दर्जा प्राप्त झाला आहे.

याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील उपप्राचार्य तथा नॅक समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह आय. क्यू. ए.सी. कमिटीचे समन्वयक प्रा. अतिश आकडे व सदस्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. सतीश ससाणे, प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author