महात्मा फुले महाविद्यालयाची अल्पावधीत नेत्र दीपक प्रगती – मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

महात्मा फुले महाविद्यालयाची अल्पावधीत नेत्र दीपक प्रगती - मा. राज्यमंत्री बाळासाहेब जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर परिसरातील नामांकित महाविद्यालय म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून या महाविद्यालयाने प्रशासनासह राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रात आदर्श कार्य करणारे विद्यार्थी घडविले या महाविद्यालयाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून अल्पावधीत नेत्र दीपक प्रगती केली आहे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे यू.जी.सी. नॅक कमिटीने सेकंड सायकल अंतर्गत मूल्यांकन केले. यात महाविद्यालयाला ‘बी प्लस ‘ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचे सेकंड सायकल अंतर्गत नॅक कमिटीद्वारे नुकतेच मूल्यांकन झाले व महाविद्यालयाने सी.जी.पी.ए.२.७ गुणांकन प्राप्त करून ‘बी प्लस ‘ दर्जा प्राप्त केल्याबद्दल माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह नॅक समन्वयक उपप्राचार्य प्रो. डॉ.दुर्गादास चौधरी, आय. क्यु.ए.सी. चे समन्वयक प्रा. अतिश आकडे, सदस्य डॉ. प्रशांत बिरादार, डॉ.सचिन गर्जे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, डॉ. सतीश ससाणे, प्रशांत डोंगळीकर आदींचा सत्कार करून महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर परिसरात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून करत असलेल्या , संशोधनात्मक, शैक्षणिक, राष्ट्रीय व सामाजिक कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पुढे बोलतांना माजी राज्यमंत्री जाधव म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने गुणवत्तेसह विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण केला. याचे आम्हा अहमदपूर वासियांना कौतुक आहे असेही ते म्हणाले. यावेळी अहमदपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author