मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास ग्रामीण भागात प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : आरक्षण योध्दा श्री मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण लढा हा अहमदपूर तालुक्यात तीव्र स्वरूपात लढला जात आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 40 दिवस साखळी उपोषण झाले असून अंतरवली सराठी नंतर सर्वात प्रभावी नियोजन बद्ध लढा हा अहमदपूर तालुक्यात लढला जात आहे 41 व्या दिवशी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करून सकल मराठा समाज बांधव समनव्यय समिती आता ग्रामीण भागात सक्रिय झाली असून आंदोलनाची पुढील दिशा म्हणून सर्कल नुसार जागोजागी साखळी उपोषण सुरू झाले आहे खंडाळी जि प सर्कल मध्ये दि.25 तारखेपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून 30 तारखेपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे खंडाळी सर्कल मधील सर्व सकल समाज बांधव या उपोषणामध्ये सहभागी होत आहेत उपोषण स्थळी कीर्तन,भजन, गोंधळ, असे समाज प्रभोदन पर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत खंडाळी ग्रामस्थांनी बस स्थानक येथील बसेस वरील सरकारी योजनेच्या जाहिरातीवर काळे फासत निषेध व्यक्त केला आहेतसेच शांततेच्या मार्गाने कँडल मार्च काढला यावेळी सर्व समाज बांधव व महिला भगिनींचा मोठा सहभाग होता तालुक्यातील शिरूर ताजबंद ,जवळगा,हंगरगा, मोघा, सताळा ,खंडाळी ,मानखेड,सय्यदपूर,टाकळगाव, रोकडा सावरगाव येथे ही साखळी उपोषण सुरू असून येथे ही कँडल मार्च काढण्यात आला आहे पुढील काळात साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणामध्ये होणार आहेमौजे मांडणी ,येथे दि 27 तारखेपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आंदोलन कर्त्यांच्या प्रकृतीवर प्रशासनाने लक्ष ठेवावे त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास गंभीर परिनामास सामोरे जावे लागेल आशा प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत समनव्यय समितीचे सदस्य ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जाऊन समाज प्रभोदन करत आहेत येत्या काही दिवसात प्रत्येक सर्कल मध्ये साखळी उपोषण तसेच गावा गावात आमरण उपोषण करण्यात येणार आहेत त्यातच मौजे ढाळेगाव येथील महेश कदम या युवकाने आरक्षनाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याने तालुक्यातील वातावरण संवेदनशील झाले आहे शासनाने आरक्षण संबंधि त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा यापुढील काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे सकल मराठा समाज समनव्यय समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.