उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटक बस पेटवली
उमरगा (मंमाळे नितीन) : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटका मधील एस टी बस आंदोलकांनी पेटवली . बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली असून कर्नाटकातील भालकीहून पुण्याकडे जाणारी ही बस होती कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अज्ञात इसमांकडून आग लावण्यात आली. बस ( के ए ३८ – एफ १२०१) भालकी ते पुणे जाणारी बस चालाक नाव अनिलकुमार बिरादार वाहक राजकुमार शिंदे यांच्यासह बसमध्ये एकूण ३९ प्रवासी होते.